Government officers garland Devendra Fadnvis | Sarkarnama

शासकीय अधिकाऱ्यांनी केला फडणवीसांचा सत्कार 

सरकारनामा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

.

मुंबई : राज्य  शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल राजपत्रित अधिकारी महासंघाने आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी संघाचे संस्थापक सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई,सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष डॉ. एस. एम.पाटील, प्रदीप शर्मा, सुदाम तावरे, विष्णू पाटील, उदय चव्हाण आदी उपस्थित होते

यावेळी श्री. कुलथे यांनी निवृत्तीचे वय 60 वर्ष आणि पाच दिवसांचा आठवडा याबाबतही त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावरही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वस्त केले.

संबंधित लेख