Government officers association complains against Ramdas Kadam to C.M. | Sarkarnama

पालकमंत्री रामदास कदम यांच्या विरोधात मुख्यमंत्र्याकडे तक्रार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

सहनिबंधक एस.बी. खरे हे जिल्ह्यातील पीक कर्जाची माहिती देत होते. ही माहिती देत असतांना ध्वनीक्षेप यंत्रणा मध्येमध्ये बंद पडत असल्याने खरे यांचे बोलणे पालकमंत्र्यांना बहुदा नीट ऐकू येत नव्हते. यावर संतापलेल्या कदमांनी " त्याला बाहेर काढा रे' असा एकेरी उल्लेख करत खरे यांना अपमानास्पद वागणूक
दिल्याचे महासंघाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे

औरंगाबाद : 24 एप्रिल रोजी झालेल्या खरीप हंगामपुर्व आढावा बैठकीत जिल्हा उपनिबंधक एस.बी. खरे यांना अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी राज्याचे पर्यावरण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

रामदास कदम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात 24 मे रोजी खरीप आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा सहनिबंधक एस.बी. खरे हे जिल्ह्यातील पीक कर्जाची माहिती देत होते. ही माहिती देत असतांना ध्वनीक्षेप यंत्रणा मध्येमध्ये बंद पडत असल्याने खरे यांचे बोलणे पालकमंत्र्यांना बहुदा नीट ऐकू येत नव्हते.

यावर संतापलेल्या कदमांनी " त्याला बाहेर काढा रे' असा एकेरी उल्लेख करत खरे यांना अपमानास्पद वागणूक
दिल्याचे महासंघाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्यातील एका विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मंत्र्यांकडून अशा पध्दतीची भाषा वापरणे योग्य नसून यामुळे अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचून त्याचा दैनंदिन कामकाजावर विपरित परिणाम होऊ शकतो.

या प्रकारा बद्दल महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ, जिल्हा समन्वय समितीने आपल्या तक्रारीत नाराजी व्यक्त केली आहे.
असा प्रकार कोणत्याही अधिकाऱ्या बाबतीत घडू नये यासाठी संबंधित मंत्र्यांना योग्य सूचना द्याव्यात अशी मागणी देखील या मुख्यमंत्र्यांकडेकरण्यात आलेल्या तक्रार अर्जात करण्यात आली आहे.

संबंधित लेख