सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीय धरणे

सरकारी वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीय धरणे

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटका, मंडळे उतरली असून आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. सोमवारी (3) झालेल्या धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने नुकतेच मराठवाड्यात उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केल्यानंतर परभणी येथील शासकीय रुग्णालय सर्व निकषात बसत असतांना व महापालिकेचे शहर असतांना देखील शासकीय रुग्णालय देण्यात आले नसल्यामुळे खासदार संजय जाधव यांनी सर्वपक्षीय आंदोलन छेडले असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (3) धरणे आंदोलन करण्यात आले. 

या प्रसंगी बोलतांना खासदार श्री. जाधव म्हणाले की, मतभेद, मनभेद, पक्षभेद, विचारभेद न ठेवता सर्व पक्ष, संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला, यातून प्रश्नाची तीव्रता लक्षात येते. तीन-चार महिण्यापुर्वीच आपण केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी संसदेत जिथे तीन जिल्हे सलग तेथे वैद्यकीय महाविद्यालय देण्याच जाहीर केले. तात्काळ आपण निवेदन देऊन परभणीला देण्याची मागणी केली. तेव्हा ते अधिकार राज्याला असल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रकरणी आपण मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना भेटलो. त्यानंतर आमच्या पक्षाचे मंत्री सुभाष देसाई, रामदास कदम, पालकमंत्री गुलाबराव पाटील व त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची देखील या प्रश्नावर भेट घेतली. श्री. महाजन यांनी वैद्यकीय महाविद्यालय देण्याचे आश्वासन दिले परंतु कधी देऊ हे मात्र सांगीतले नाही व उस्मानाबाद व धुळ्याची घोषणा झाली. लहानपणापासून आपला जिल्हा रुग्णालयाशी संबंध येतो. तेथील सर्वसामान्यांच्या यातना, दुःख जवळून पाहतो. हा गंभीर प्रश्न महाविद्यालय झाल्याशिवाय सुटू शकत नाही. रेफरची प्रथा बंद होणार नाही. त्यामुळे आता यश मिळाल्याशिवाय माघार नाही, असेही स्पष्ट केले. 

यावेळी महापौर मिना वरपुडकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, उपमहापौर सज्जुलाला, भगवान वाघमारे, डॉ. मिना परतानी, एकनाथ साळवे, डॉ. राजेश सुरवसे, अनंतराव देशमुख, सूर्यकांत हाके, राजन क्षीरसागर, विजय वाकोडे, सुनिल देशमुख, किर्तीकुमार बुरांडे, गंगाधर जवंजाळ, डॉ. जोगड, ओमप्रकाश डागा, बालासाहेब राखे, विलास बाबर, प्रा.डॉ. माधव शेजुळ, शंकर आजेगावकर, हाफीज चाऊस, किर्तीकुमार बुरांडे, विलास बाबर, संदीप सोळंके, डॉ. राजगोपाल कालाणी, ऍड. अशोक सोनी, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. दीपक देशमुख, ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करून न्याय मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत खासदारांच्या खांद्याला खांदा लावून पाठींबा देण्याचे सुतोवाच केले. 

सूत्रसंचालन लक्ष्मीकांत क्षीरसागर यांनी तर जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आभार मानले. तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले. 
या आंदोलनात बहुतांश राजकीय पक्ष, औद्योगीक संघटना, व्यापारी महासंघ, वकील संघ, जेष्ठ नागरीक, सेवानिवृत्त नागरीक, शिक्षक संघटना, शारीरिक शिक्षक संघटनांसह सामाजिक संघटनांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 
पैशाचे पाकिट सापडले 
धरणे आंदोलना दरम्यान एका खुर्चीवर पैशाचे पाकीट आढळून आले. ते खासदार श्री. जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ध्वनीक्षेपकावर ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले परंतु संबंधीत व्यक्ती निघून गेल्याचे दिसून आले. ज्यांचे असेल त्यांनी माधव शिंदे ( 9623646787 ) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com