government advertisement | Sarkarnama

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींचा भडिमार

ब्रह्मा चट्टे
रविवार, 11 जून 2017

मुंबई : राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वारे जोरात सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. त्याचवेळी केंद्र सरकारकडून तीन वर्षे झाल्याबद्दल जाहिरातींचा भडिमार केला जात आहे. वर्तमान पत्रांमध्ये दोन दोन पाने भरून सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांचा दाखला देत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा अटोकाट प्रयत्न सरकारच्या वतीने जोरात सुरू आहे. 

राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा यासारख्या मागण्या करत 1 जूनपासून संपावर गेला होता. राज्यातील शेतकरी संप हाताळण्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांचा संप चिघळला. त्यानंतर आता नव्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. यावरून शेतकरी सरकारला चांगलेच कोडीत पकडण्याच्या तयारीत आहे. शेतकरी संघटना सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी येत्या 13 जूनला राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलना संदर्भात तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीशी सरकारने वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सुकाणू समितीशी बोलण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमण्यात आली आहे. तरीही राज्यातील शेतकऱ्यांचा रोष कमी होण्याची शक्‍यता दिसत नसल्याने आता जाहिरातीच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणांसाठी विविध योजना घोषित केल्या आहेत. या विविध योजनांचा प्रचार जोरात केंद्राच्या माध्यमातून जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहिरातींचा उतारा देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

संबंधित लेख