gover programme in pune cancel | Sarkarnama

राज्यपालांचा पुण्यातील स्वातंत्र्य दिनाचा चहापान कार्यक्रम रद्द 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुंबई : दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला राजभवन, पुणे येथे आयोजित केला जाणारा राज्यपालांचा चहापानाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. 

पोलादपूर जवळील आंबेनळी घाट येथे झालेल्या बस दुर्घटनेत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा यांचा मृत्यू झाला. या दुःखद पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी पुणे येथील राजभवनात दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केलेला चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजभवनातून आज जाहीर करण्यात आले. 

मात्र 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कौन्सिल हॉल पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते होणारा झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख