Gor- banjara community to draw march against government on 1 July | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

सरकारविरोधात आता गोर-बंजाराचा आक्रोश मोर्चा 

सरकारनामा न्युज ब्युरो
रविवार, 11 जून 2017

मुंबई :  राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा, धनगर समाजाचे मोर्चे, आंदोलने सुरू असतानाच आता त्यात राज्यातील गोर-बंजारा समाजाचीही भर पडणार आहे.

 देशात आणि राज्यातही मोठ्या प्रमाणात गोर-बंजारा समाजावर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात आणि त्यासोबत आपल्या न्याय व हक्‍कासाठी गोर-बंजारा समाजाकडून मुंबईत 1 जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 

या मोर्च्याच्या तयारीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी बैठका सुरू असून यात धनगर समाजाच्या आरक्षणाप्रमाणेच आमचीही वेगळी ओळख सरकारने स्पष्ट करावी अशी मागणी यातून रेटली जाणार आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला संविधानिक अधिकार मिळाले असले तरी आजतागायत गोर-बंजारा समाज मोठ्या प्रमाणात घटनात्मक सवलतींपासून वंचित राहिलेला आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने राज्यात या समाजातील तरूणांना शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे . 

न त्यापार्श्‍वभूमीवर आम्ही गोर-बंजारा आहोत की, नाही हेच आता सरकारने स्पष्ट करावे, त्यासाठी अध्यादेश काढून आपली एक वेगळी ओळख आम्हाला द्यावी ही प्रमुख मागणी या आक्रोश मोर्च्याच्या निमित्ताने समोर आणली जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. 

गोर-बंजारा समाजाचा हा मोर्चा आझाद मैदान, मुंबई येथे 1 जुलै रोजी काढला जाणार असून पहिल्यांदाच या मोर्च्यात गोर-बंजारा समाजातील विविध संघटना एकत्र येत आहेत. राज्यात आत्तापर्यंत सहा ठिकाणी बैठका पूर्ण झाल्या असून यात सोलापूर, यवतमाळ, नांदेड, बीड जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

 या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात तरूणांचा समावेश असणार असून आपल्या संविधानिक अधिकारीची ही लढाई आम्ही आक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून लढणार असल्याचे मोर्च्याच्या आयोजकाकडून सांगण्यात आले. 

संबंधित लेख