gopichand padalkar about loksabha election | Sarkarnama

सांगली लोकसभा लढविणार : पडळकर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

लोकसभेच्या मैदानात उतरणार, असे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आज स्पष्ट केले. 

आटपाडी : जनता, नेत्यांच्या आग्रहास्तव लोकसभेच्या मैदानात उतरणार, असे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आज स्पष्ट केले. 

येथील शासकीय विश्रामगृहावर ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना त्यांनी पक्षाविरोधात केलेले बंड, लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. 

ते म्हणाले," जिल्ह्यातील परिस्थितीवर केलेल्या भाष्य व नेत्यांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ हिजारो लोकांनी पाहिले. अनेकांनी फोन करून लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. अशा वेळी मी का लढू नये.''  

संबंधित लेख