gopal dukhande | Sarkarnama

ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई : ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळ दुखंडे(वय 72) यांचे आज सावंतवाडी येथे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी उर्मिला,कन्या सोनाली आणि दोन मुलगे संतोष आणि संदीप आहेत. 

वडील गिरणी कामगार, लहानपणा पासून संघर्ष करीत दुखंडे सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. युक्रांद या युवक चळवळी मधून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. 
कोकणाच्या प्रश्‍नांवर प्रचंड आस्था असलेले ते होते. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात दुखंडे सर होते. 

प्रा. मधू दंडवते यांचे ते निकटचे सहकारी होते. मालवण विधान सभा मतदार संघातून त्यांनी 1995 साली नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत आग्रह धरीत. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले. 

छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्या पासून लक्ष घातले होते. कपिल पाटील, शरद कदम या त्यावेळच्या विद्यार्थी नेत्याना हाताशी धरून त्यांनी अनेक आंदोलने उभी केली. 

काही वर्षा पूर्वी ते सावंतवाडीत स्थायिक झाले होते. त्यांचे पार्थिव मंगळवारी रात्री मुंबईत आणले जाईल आणि उद्या बुधवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर गोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

प्रा.गोपाळ दुखंडे सरांनी आमच्यासाठी आणि या चळवळीसाठी खूप करून ठेवले आहे. समाजातील प्रश्‍नांबाबत सतत अस्वस्थ असणारा तळमळीचा समाजवादी नेता आपल्यातुन निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझी आणि पुरोगामी चळवळीची खूप हानी झाली आहे. 
शरद कदम, 
कार्याध्यक्ष,राष्ट्र सेवा दल, मुंबई 

संबंधित लेख