gondiya-rajkumar-badole-bjp-meet | Sarkarnama

कॉंग्रेसने गरीबी हटविली नाही, तर गरीबांना हटविले : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले 

मुनेश्‍वर कुकडे
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

कॉंग्रेसने देशावर 60 वर्षे राज्य केले. `गरिबी हटाव'चा नारा दिला. देशातील गरिबी हटली नाही, पण भ्रष्टाचाराने गरिबांनाच हटविण्याचे काम झाले, असा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.

गोंदिया : कॉंग्रेसने देशावर 60 वर्षे राज्य केले. `गरिबी हटाव'चा नारा दिला. देशातील गरिबी हटली नाही, पण भ्रष्टाचाराने गरिबांनाच हटविण्याचे काम झाले, असा आरोप सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.
 
गोंदिया जिल्हा भाजपतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी राजकुमार बडोले यांनी कॉंग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार रमेश कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, राधेश्‍याम अग्रवाल, जिल्हा परिषद सभापती शैलजा सोनवाने, ओबीसी आघाडी प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नागपुरे, पंचायत समितीचे गटनेता रामराज खरे, नगरसेवक भरत क्षत्रिय, दिनेश दादरीवाल, गणेश हेमणे, नंदकुमार बिसेन, माजी सभापती छाया दसरे, जिल्हा परिषद सदस्य श्‍यामकला पाचे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अमित बुद्धे उपस्थित होते.
 
बडोले म्हणाले, की समाजातील शोषित, पीडितांच्या कल्याणासाठी योजना आणल्या जात आहेत. डीबीटीमुळे लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असून, दलाली संपविली आहे. कॉंग्रेसने केवळ गरीबी हटावची घोषणा दिली होती. यातून गरीबांना हटविण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकार अनेक कल्याणकारी योजनेतून सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे कार्य करीत आहे.
 

संबंधित लेख