`गोकुळ`ला `अमूल`च्या पातळीवर न्यायचयं; पण विरोधक दिशाभूल करतात : महाडिक

`गोकुळ`ला `अमूल`च्या पातळीवर न्यायचयं; पण विरोधक दिशाभूल करतात : महाडिक

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट झाला तर कोणालाही सभासद होता येणार नाही. संघावर केंद्राने दिलेल्या कायद्यानूसारच संघाचा कारभार सुरू राहणार, कामगारांना कोणताही धोका नसणार आहे, असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केला.

 ज्या संस्था 50 लिटरपेक्षा कमी दूध संकलित करतात व ज्यांनी इतर अटी पूर्ण केलेल्या नाहीत, अशा संस्थांना सभासदत्व दिलेले नाही. त्यामुळे, जे कोण मल्टिस्टेला विरोध करत आहेत. ते लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका महाडिक यांनी या वेळी केली.

 
श्री. महाडिक म्हणाले, `अमूल`सारखी संस्था देशपातळीवर काम करत आहे. हजारो-लाखो कामगार येथे काम करतात. त्यांना कोणीही कामावरून कमी करत नाहीत, किंवा हवे त्यावेळी नवीन भरली जात नाहीत. गोकुळ पूर्वी तालुका संघ होता. त्यांनतर जिल्हा संघ म्हणून नावारूपाला आला. आता या संघाचे कार्यक्षेत्र तीन-चार राज्यात होत असेल तर गोकुळसाठी हे अभिमानास्पद आहे. पण, काही लोक याला विरोध करत आहे. त्यांची आपली संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. गोकुळ केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता देशपातळीवर नावारूपाला आणला पाहिजे, यासाठी काम केले पाहिजे. सभासदांची आणि दूध उत्पादकांची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. विरोध करणाऱ्यांच्या हातात काहीही नाही. त्यामुळे काहीतरी चुकीचा संदेश देवून चांगल्या कल्पनेला विरोध करायचे काम होत आहे.

 
ते म्हणाले, जिल्ह्यातील अनेक संघ आणि साखर कारखाने मल्टिस्टेट झाले आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. मग गोकुळमध्ये कशी काय अडचण येईल. असा सवालही श्री महाडिक यांनी केला. विरोध करणाऱ्यांनी मल्टिस्टेट या कायद्याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल केली जात अाहे.

आमदार चंद्रदिप नरके यांनी काल (ता. 16) कळंबा (ता. करवीर) येथे दूध उत्पादक संस्था, सभासदांचा मेळावा घेवून गोकुळ मल्टिस्टेट होण्याला विरोध केला. यावेळी नरके यांनी मल्टिस्टेटला महादेवराव महाडिक यांनीच आता विरोध करावा असे आवाहन केले होते. याला उत्तर देताना श्री महाडिक म्हणाले, चंद्रदिप नरके हे अभ्यासू आहेत. त्यांनी संघाला मोठे करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघाचा नावलौकिक करण्यासाठी  नरके यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. मल्टिस्टेटमुळे संघाची उलाढाल आणि नफा कसा वाढणार हे त्यांनाही माहिती असल्याचे श्री महाडिक यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com