gokul politics | Sarkarnama

मुर्दे को पुछो, कातिल कौन?

सुनील पाटील 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

गेल्या निवडणूकीत गोकुळच्या कारभाऱ्यांचे तीन उमेदवार पडले आहेत. म्हंणजे शाहिस्तेखानाची तीन बोटे तुटली आहेत. त्यामुळे संघ मल्टिस्टेट झाला नाहीतर मात्र पुन्हा संघात आपली काय धडगत नाही, असेच विद्यमान संचालकांना वाटत असेल्याची टिकाही श्री जाधव यांनी केली. 

कोल्हापूर : गोकुळच्या नोकरभरतीत दहा-वीस लाख घेतल्याचे कोणीही सांगावे, त्याला मी पन्नास लाख देतो असे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी जाहीर करणे म्हणजे "मुर्दे को पुछो, कातिल कौन? अशी जोरदार टीका जेष्ठ नेते मारूतराव जाधव यांनी माजी आमदार पी.एन. पाटील यांच्यावर केली.

गोकुळ बचाव कृती समितीच्यावतीने शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील उपस्थित होते. 

श्री जाधव म्हणाले, पी. एन. पाटील यांच्यासारखे सुज्ञ नेतेही चुकीचा प्रकारे बोलत आहेत. सध्या सहकारी दूध संस्थांना गोकुळचे सभासद होता येते. मात्र मल्टिस्टेटच्या कायद्यामध्ये एखादी नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेलाही सभासद करता येते. मग एखादी संस्था नोंदणी करायची म्हटली, तर सत्यम साखऱ्या हजारो संस्था नोंद करता येतात. कंपन्या स्थापन करायचे अवघड नाही. त्यामुळे मल्टिस्टेट झाल्यानंतर हे सर्वच तेथे घुसल्याशिवाय राहणार नाहीत, त्यामुळे आपले म्हणजे एक शून्य बाजीराव अशी अवस्था होवून बसेल. अशीही टिका केली.  

 

संबंधित लेख