Gokul Meeting Narke Brothers talk of the town | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

गोकुळच्या सभेत नरके बंधू हिरो : ट्रेलर झाला आता पिक्‍चर दाखवू 

सदानंद पाटील 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

गोकुळ मल्टीस्टेट विरोधातील लढाईत उशीराने आलेल्या, मात्र वादळासारखे घुसलेल्या आमदार नरके यांनी मल्टीस्टेट करायला निघालेल्या नेत्यांवर एकसारखा हल्लाबोल केला. त्यांनी सुरुवातीला पारंपारिक विरोधक संघाचे नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांना लक्ष्य केले असले तरी नंतरच्या टप्प्यात त्यांनी संघाचे दुसरे नेते महादेवराव महाडिक यांनाही लक्ष केले. सभास्थळी पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांचाही त्यांनी समाचार घेतला.

कोल्हापूर : गोकुळच्या सर्वसाधारण सभेत ताकदीने घुसून, सत्ताधाऱ्यांना शडडू ठोकून आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या आमदार चंद्रदीप नरके व त्यांचे बंधू अजित नरके यांनी आज खऱ्या अर्थाने सभा जिंकली. अत्यंत जिगरबाजपणे कोणत्याही विरोधाची तमा न बाळगता हे दोन बंधू हातात-हात घालून ज्या पध्दतीने घुसले, ते पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला नसला तरच नवल. मल्टीस्टेटचा ठराव करुन सत्ताधारी जिंकले असले, तरी सभा संपल्यानंतर चर्चा होत राहिली ती आमदार चंद्रदीप नरके यांचीच. 

गोकुळ मल्टीस्टेट विरोधातील लढाईत उशीराने आलेल्या, मात्र वादळासारखे घुसलेल्या आमदार नरके यांनी मल्टीस्टेट करायला निघालेल्या नेत्यांवर एकसारखा हल्लाबोल केला. त्यांनी सुरुवातीला पारंपारिक विरोधक संघाचे नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांना लक्ष्य केले असले तरी नंतरच्या टप्प्यात त्यांनी संघाचे दुसरे नेते महादेवराव महाडिक यांनाही लक्ष केले. सभास्थळी पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांचाही त्यांनी समाचार घेतला. विधानसभा सदस्याला अशी वागणूक दिली तरी सोडणार नाही, अशा शब्दात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी कान उघाडणी केली. तसेच पोलीस अधिकारी व गोकुळ कर्मचारी दरवाजा उघडत नसल्याचे पाहून आमदार नरके यांनी थेट दरवाजावर लाथ घालून तो मोडून काढत आत प्रवेश केला. 

आमदार नरके ज्या पध्दतीने आत आले तसे कार्यकर्त्यांची धावाधाव सुरु झाली. त्यातूनही एकाने त्यांना अडवण्यासाठी येण्याचा प्रयत्न करताच, त्यांनी त्या कार्यकर्त्याला 'तिथंच थांबायचं. पुढं आला तर याद राखा,' असे सुनावताच धडाधड रस्ता रिकामा झाला. सत्ताधारी गटाच्या ठरावरधारक व कार्यकर्त्यांचेही नरके यांच्यासमोर येण्याचे धाडस झाले नाही. 

संबंधित लेख