godavari river pull kakasaheb shides name | Sarkarnama

गोदावरी नदीवरील "त्या' पुलाला हुतात्मा काकासाहेब शिंदेंचे नाव 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

औरंगाबाद ः मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा दशक्रिया विधी आज (ता.1) कायगांव टोका येथे शांततेत पार पडला. गोदावरी नदीवरील ज्या पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी घेतली होती. त्या पुलाला काकासाहेब यांचे नाव देत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. दशक्रिया विधीसाठी आज औरंगाबाद-नगर मार्ग बंद ठेवण्यात आला होता. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगापूर तालुक्‍यातील कायगांव टोका पुलावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी औरंगाबाद-नगर-पुणे महामार्ग दोन दिवस रोखून धरला होता. 

काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने अग्निशामक दलासह पोलीसाची गाडी जाळली होती. तसचे पोलीसांवर दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे कायगांव टोका सलग दोन दिवस अक्षरशा धुमसत होते. 

आज काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी असल्यामुळे औरंगाबाद-नगर महामार्ग बंद करण्यात आला होता. सकाळी विधीसाठी शेकडो मराठा तरूण, आंदोलक कायगांव टोका येथे जमले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. गोदावरी नदीवरील कायगांवच्या पुलाला "हुतात्मा स्व. काकासाहेब शिंदे' असे नाव देण्यात आले आहे.  
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख