goa-vijah-sardesai-warns | Sarkarnama

`मी खासगी हेतूचा विचार केला तर वेगळ्या गोष्टी घडतील'; विजय सरदेसाईंचा गर्भित इशारा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

मडगाव : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आजारपण व त्यामुळे निर्माण झालेल्या सरकारच्या नेतृत्वाच्या मुदद्यावरून सारे काही आलबेल नाही, असे नगरनियोजनमंत्री व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांनी  केलेल्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

मडगाव : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आजारपण व त्यामुळे निर्माण झालेल्या सरकारच्या नेतृत्वाच्या मुदद्यावरून सारे काही आलबेल नाही, असे नगरनियोजनमंत्री व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांनी  केलेल्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

सारे काही आलबेल आहे असे कोणी म्हणत असेल तर तो दांभिकपणा ठरणार असून मी दांभिक नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आम्हाला दिल्लीत बोलवून घेतले. ते सारे काही आलबेल होते म्हणून का, असा सवाल सरदेसाई यांनी केला. 

नेतृत्वाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठीच शाह यांनी आम्हाला दिल्लीत बोलावते होते, असे त्यांनी स्पष्ट केले. आगाळी - फातोर्डा येथे एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

नेतृत्वावषयी सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्यावर काब्राल यांनी सरदेसाई यांचे मत त्यांच्या खाजगी हिताचे होते अशी प्रतिक्रिया दिल्याचे प्रसिद्धी माध्यमात छापून आले आहे. काब्राल यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा केली असून आपल्या वक्तव्याचा प्रसिद्धी माध्यमांनी विपर्यास्त केला असल्याचे त्यांनी आपल्यास स्पष्ट केले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. या संदर्भात काब्राल खुलासाही करणार आहेत, असेही त्यांन स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सोबत युतीची बोलणी निवडणूक निकालाच्या आधीच करण्यात आली होती. तो निश्चितच खाजगी हेतू नव्हता. मी खाजगी हिताचा विचार करावा असे कुणाला वाटत असेल तर वेगळ्या गोष्टी घडतील असा गर्भित इशारा सरदेसाई यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी आहेत ही वस्तुस्थिती आहे. याचा त्यांच्यावर व त्यांच्या कामावर परीणाम झाला आहे. त्याच बरोबर याचा प्रशासनावरही परिणाम झाला आहे. पण, गोमंतकियांचे काळीज मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या बारीक सारीक चुका शोधत बसणेही योग्य नाही. पण, याचा अर्थ कोणी काही म्हणेल आणि मी गप्प बसेन असाही नाही. काब्राल यांनी खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना आधी खुलासा करू द्या. मी खुलाशाची प्रतीक्षा करत आहे. आणि जर त्यांनी खुलासा केला नाही तर मग पुढे पाहू असाही इशारा त्यांनी दिला आहे. 

संबंधित लेख