in goa no cm congress says | Sarkarnama

मुख्यमंत्रीच नसल्याने गोव्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पणजी : अमेरिकेमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि इतर दोन मंत्री आजारपणामुळे उपलब्ध नसल्याने गोव्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने केली आहे. 

गोव्यामध्ये घटनात्मक पेच निर्माण झाला असून, याबाबत राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेणार असल्याचे गोवा कॉंग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी पत्रकारांना सांगितले. 

"पर्रीकर हे आरोग्याच्या कारणास्तव सातत्याने अनुपस्थित असून, त्यांनी पदभारही इतर कोणाकडे सोपविलेला नाही. शिवाय, ऊर्जामंत्री पांडुरंग मडकैकर आणि नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसूझा हेदेखील आजारी आहेत. मुख्यमंत्री आणि हे दोन मंत्री कधी कामावर हजर होतील, याबाबत काहीही माहिती नसल्याने राज्यपालांनी हस्तक्षेप करणे आवश्‍यक आहे,' अशी मागणी खलप यांनी केली. 

पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या विकारावर उपचार घेत असून, त्यासाठी ते मार्च आणि जून महिन्यांत अमेरिकेमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यानंतर ते 10 ऑगस्टला पुन्हा तिकडे जाऊन 22 ऑगस्टला परतले. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करावे लागले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार गेल्या गुरुवारी ते पुन्हा अमेरिकेला गेले असून, आठ सप्टेंबरला परतण्याची शक्‍यता आहे, असे एका भाजप नेत्याने सांगितले. 

डिसूझा हेदेखील वैद्यकीय उपचारासाठी गेल्या महिन्यात अमेरिकेला गेले असून, मडकैकर यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर पाच जूनपासून ते मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. 
 
संबंधित लेख