goa congress attack bjp government | Sarkarnama

"एम्स'मध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेणे घटनाविरोधी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली :  भाजपने बहुमत गमावल्याची कबुली प्रदेश भाजप अध्यक्षांनी दिल्यानंतरही सत्तेला चिकटून राहण्याचा प्रकार भाजप करीत आहे. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची सत्तापिपासा लक्षात येते, अशी टीका गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी आज एका निवेदनाद्वारे केली. 

गोव्यात भाजपने बहुमत गमावले असल्याने सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष या नात्याने राज्यपालांनी कॉंग्रेसला सरकारस्थापनेसाठी निमंत्रित करावे, गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमताची चाचणी केली जावी आणि गोव्यात अधिमान्य व कायदेशीर सरकारची स्थापना करून गोव्याच्या जनतेच्या आशाआकांक्षांना न्याय दिला जावा, अशा मागण्या कॉंग्रेसतर्फे आज करण्यात आल्या.

गोव्यात काळजीवाहू किंवा हंगामी किंवा उपमुख्यमंत्री नेमूनही कारभार करण्याचे भाजपने नाकारले आहे व हे घटनाबाह्य आचरण असल्याची टीकाही कॉंग्रेसने केली आहे. 

कॉंग्रेस आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पर्रीकर यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लवकरात लवकर बरे होऊन गोव्याचा राज्यकारभार पूर्ववत सुरू करावा, अशी अपेक्षाही कॉंग्रेसने व्यक्त केली;

परंतु त्याऐवजी दिल्लीतून व रुग्णालयातून राज्याचा कारभार चालविण्याचा अशोभनीय प्रकार सुरू करण्यात आला आहे, असे सांगून चोडणकर यांनी पर्रीकर यांना गोव्यात जाऊन मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळणे शक्‍य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, सभागृहात भाजपचे बहुमत सिद्ध करावे आणि अन्य कोणा वरिष्ठ नेत्याकडे सरकारची सूत्रे सोपवावीत, अशा मागण्याही केल्या.  

संबंधित लेख