GOa All party leaders unite against Nitesh Rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

राणे यांचेही हॉटेल गोव्यात आहे : गोव्यात सर्व पक्षीय नेत्यांचा इशारा 

अवित बगळे
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

शिवसेनेचे राज्यप्रमुथ जितेश कामत यांनीही राणे यांचे हॉटेल गोव्यात आहे आणि सिंधुदुर्गातील अनेकजण कामाच्या निमित्ताने गोव्यात येतात हे गोव्यातून गाड्यांना सिंधुदुर्गात लक्ष्य करण्यापूर्वी विचारात घ्यावे ,असा सुचक इशारा दिला आहे.

पणजी :  कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गोवा सरकारने सिंधुदुर्गातील मालेवाहू गाड्यांना प्रवेश दिला नाही तर गोव्याची एकही गाडी सिंधुदुर्गात फिरू देणार नाही असा इशारा काल दिला होता. त्याचे पडसाद आज गोव्यात उमटले. राणे यांच्या धमकीला कोणी जुमानत नाही असाच सूर विविध पक्षीय नेत्या्ंचा होता.

गोव्यात माशांमध्ये मानवी मृतदेह टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे आणि कर्करोगासाठी कारण ठरणारे फॉर्मलीन हे घातक रसायन सापडल्यानंतर गोवा सरकारने पावसाळ्यात १५ दिवसांसाठी परराज्यातून मासे आणण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर बंदी उठवली व अचानक तपासणी सुरु केली. 

आता सरकारने अन्न व औषध प्रशासन खात्याचा परवाना असलेल्या मासळी विक्रेत्यांना आणि इन्सुलेटेड वाहनांतून मासळी आणण्यास परवानगी दिली आहे. सिंधुदुर्गातील मासळी व्यापाऱ्यांकडे ना परवाना ना विशिष्ट वाहने. त्यामुळे त्यांच्या मासळीवाहू गाड्यांना गेला आठवडाभर गोव्यात प्रवेश मिळत नाही.

यामुळे संतप्त होऊन राणे यांनी इशारा दिला असला तरी गोवा सरकारने त्यांच्या दबावाखाली न येण्याचे ठरवले आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की सरकार कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. लोकांना सुरक्षित अन्न देणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडत आहोत. आम्ही काही नियम केले आहेत त्याचे पालन करावेच लागेल.

गोव्यात मडगाव येथे घाऊक मासळी बाजार आहे. तेथे वास्तव्यास असलेले नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई म्हणाले. गोव्याचे जीवनमान उंच आहे. मासे हे गोमंतकीयांचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे त्याच्या दर्जाविषय़ी कोणी तडजोड करणार नाही. कोणी कुठे बसून धमक्या दिल्या म्हणून सरकार निर्णय बदलेल असे कोणाला वाटत असेल तर त्याची ती चुकीची समजूत आहे.

 

संबंधित लेख