give water, not helmet | Sarkarnama

पाणी द्या, हेल्मेट नको : पुणेकर पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

उमेश घोंगडे
बुधवार, 9 जानेवारी 2019

 पुणे : पुण्याला पुरेसे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला करण्याची मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांकडून होणारी दंडाची कारवाई थांबविण्याची मागणीदेखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. 

 पुणे : पुण्याला पुरेसे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला करण्याची मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांकडून होणारी दंडाची कारवाई थांबविण्याची मागणीदेखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. 

महापौर टिळक यांच्यासोबत महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या महिन्यात पुणे भेटीत पुण्याला पाणी कोटा वाढवून देण्याची सूचना पाटबंधारे विभागाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्याची आठवण आज पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना करून दिली.

पुण्याला होणाऱ्या पाण्यात आणखी कपात करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे येत्या एक फेब्रुवारीपासून पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठ्याची वेळ येणार आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल. पुणेकरांच्या आणखी रोषाला सामोरे जावे लागेल, याची कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. 

हेल्मेटसक्ती करताना पोलिसांकडून दंड आकारण्यात येत आहे. या विषयावरून पुणेकरांमध्ये कमालीचा असंतोष आहे.त्यामुळे हेल्मेट सक्ती व त्यासाठी करण्यात येणारी दंडाची कारवाई थांबण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे भीमाले यांनी सांगितले. हेल्मेटवरून सर्व विरोधी पक्ष कृती समितीच्या माध्यमातून वातावरण निर्माण करीत आहे. हे वातावरण पक्षाच्या विरोधात होत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती आणि त्यापोटी होणारी दंडाची कारवाई थांबविण्यात गरज यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आली. 

 

संबंधित लेख