Give us Vidhansabha Seat demands Pratap Dhakne Supporters | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

लोकसभा नाही तर विधानसभा तरी द्या; अॅड. ढाकणे समर्थकांचा सूर

राजेंद्र सावंत
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे लोकसभेसाठी उत्सुक असल्याने त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ऐनवेळी ढाकणे अथवा त्यांच्या पत्नी जिल्हा परीषद सदस्या प्रभावती ढाकणे यांना शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन मिळेल, असा दावा ढाकणे समर्थंकांकडून केला जात आहे.

पाथर्डी (नगर) : नगर दक्षिणची लोकसभेच्या जागेवर काँग्रेस टपून आहे. राष्ट्रवादीकडे जागा राहिली तरी ती आमदार अरुण जगताप यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेची नाही, तर विधानसभेची तरी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांच्या गटातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या आमदार मोनिका राजळे विरुद्ध आघाडीकडून प्रभावती ढाकणे यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.

केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे लोकसभेसाठी उत्सुक असल्याने त्यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ऐनवेळी ढाकणे अथवा त्यांच्या पत्नी जिल्हा परीषद सदस्या प्रभावती ढाकणे यांना शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन मिळेल, असा दावा ढाकणे समर्थंकांकडून केला जात आहे.

शेवगाव–पाथर्डी मतदारसंघात पूर्वी राष्ट्रवादीचे चंद्रशेखऱ घुले यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. मोदी लाट आणि मोनिका राजळे यांच्या भाजपा प्रवेशाने गेल्या वेळी मतदार संघाचे गणित उलटे झाले. मतदार संघातील दोन्ही तालुक्यातील वंजारी समाजाचे सुमारे साठ ते पासष्ट हजार मतदान निर्णायक आहे. मोनिका राजळे यांना पंकजा मुंडे यांची मिळालेली साथच त्यांच्या विजयाचे गणित बनले आहे. प्रताप ढाकणे यांना लोकसभेला उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांना विधानसभेला उमेदवारी देण्याचा विचार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमधे सुरु असल्याचा दावा ढाकणे समर्थक करीत आहेत. 

मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी ऐनवेळी प्रभावती ढाकणे यांनाही उमेदवारी मिळू शकते. मोनिका राजळे व प्रभावती ढाकणे यांच्यातील लढाई जिल्हाभर गाजेल. ढाकणे निवडणूक लढविणारच हे सत्य आहे. त्यांनी लोकसभेसाठी उत्सुक असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना बोलून दाखविले आहे. 

दरम्यान, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पाथर्डी तालुक्याचा संपर्क गेल्या चार वर्षात अतिशय कमी केल्याने ते शेवगाव-पाथर्डीपेक्षा नेवासा मतदार संघाकडे जास्त लक्ष देत असल्याचे जाणवते आहे. प्रभावती ढाकणे यांना निवडणूक रिंगणात उतरुन राष्ट्रवादी महिलांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात ढाकणे-राजळे यांचा राजकीय संघर्ष पुन्हा पाहवयास मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

मैत्री कधी कामी येणार
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीयमंत्री बबन ढाकणे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. ढाकणे यांचे चिंरजीव प्रताप ढाकणे यांच्या राजकीय पु्र्नवसनासाठी ढाकणे-पवार यांच्या जवळकीचा फायदा नक्कीच होईल आणि उमेदवारी ढाकणे यांच्या घरातच मिळेल, असा दावा ढाकणे यांचे समर्थक करीत आहेत.

संबंधित लेख