give ticket to gurudas kamat family congress demond | Sarkarnama

गुरूदास कामत यांच्या वारसांना उमेदवारी द्या ! 

मृणालिनी नानिवडेकर 
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मुंबई ः उत्तर पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ 2009 साली गुरूदास कामत यांनी जिंकला होता, 2014 साली मोदी लाटेत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी त्यांचा पराभव केला. आता नव्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील कुणाला तरी ही उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरते आहे. 

कामत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शोकसभेला त्यांच्या समर्थकांनी विलेपार्ले परिसरात केलेली गर्दी त्यांच्या लोकप्रियतेचे दयोतक असून कामत यांचा वारसा राजकारणात जपला पाहिजे अशी मागणी समोर येते आहे. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास या परिसरातले वातावरण कॉंग्रेस अनुकूल होईल हे लक्षात घेत उत्तरप्रदेशातील कॉंग्रेस नेते राज बब्बर यांनी या मतदारसंघात रस दाखवला आहे. 

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे देखील उत्सुक आहेत.मात्र कामत यांना निरूपम सातत्याने विरोध करीत असे कारण देत विरोधी गट सक्रीय झाला आहे. कामत यांच्या पत्नी महारूख अत्यंत सज्जन तसेच मनमिळावू व्यक्‍तीमत्व म्हणून ओळखल्या जातात तर मुलगा सुनील हा वैदयकीय व्यवसायात उच्च शिक्षण प्राप्त केलेला युवक आहे. सध्या कुटुंब धक्‍क्‍यात आहे त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिरण्याचा निर्णय घेण्याच्या ते दोघेही मन:स्थितीत नाहीत .मात्र कार्यकर्ते आग्रही असल्याचे सांगितले जाते आहे. 

संबंधित लेख