...give slap on face : Thakrey | Sarkarnama

..तर महिलांनो थेट कानाखाली आवाज काढा : ठाकरे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

पुणे : महिला अत्याचारासंदर्भात आवाज उठवलेल्या "मी टू'मोहिमेचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले. महाराष्ट्रातील महिलांनी अजिबात अन्याय खपवून घेऊ नये. आपल्यावरील अन्यायाची तक्रार करण्यात उगाच पाच-दहा वर्षांची वाट पाहण्यापेक्षा घटना घडताच थेट कानाखाली आवाज काढा, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.

अडचणी आल्यास शाखांवरील शिवसैनिकांना भेटा, ते तुमच्य मदतीला येतील, असे सांगून त्यांनी महिलावर्गाला धीर दिला. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, राममंदिरासह महिला अत्याचाराचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांनी आपल्या भाषणात "मी टू' मोहिमेचा आवर्जून उल्लेख करीत, दोषींना पाठिशी घालू नये, अशी भूमिका मांडली. 

ते म्हणाले, ""महिलांबाबत देशभर काय चालले आहे, याचे सरकारला काही घेणे-देणे नाही. महिला अत्याचारच्या विरोधात सरकार ठोस पावले उचलत नाही. त्यामुळे महिला स्वत:हून पुढे येत आहेत. या मोहिमेत अनेकांची नावे घेतली जात आहेत. त्यात कोण किती मोठा आहे, याचा विचार न करता दोषींवर कारवाई केली पाहिजे. कोणालाही सोडता कामा नये. सरकारवर विसंबून राहू नका. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला. याविरोधात आवाज उठवला पाहिजे. अन्यायाला वाचा फोडण्यात मागे राहू नका. ज्या प्रकरणात मदत लागेल, त्यासाठी शिवसेनेच्या शाखांशी संपर्क साधा. प्रत्येक महिलांच्या मदतील शिवसैनिक धावून येईल. '' 

""निर्भय बलात्कार प्रकरणी आरोपींना शिक्षा झाली. त्याचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, इतर गुन्ह्यांतील गुन्हेगार मोकाट आहेत. त्यामुळे अशा घटना वाढत आहे. आरोपींना धाक राहिलेला नाही. तो निर्माण करण्याची गरज आहे. मागील निवडणुकीत म्हणजे 2014 ची हवा बदलली आहे. तशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे सांगत, मोदींचा करिष्मा ओसरल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख