Gita Gopinath is next IMF Chief Economist | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

`आयएमएफ'च्या मुख्य अर्थतज्ज्ञपदावर भारतीय महिला विराजमान

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक गीता गोपिनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. 

पुणे : हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक गीता गोपिनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून आज नियुक्ती करण्यात आली. 

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी त्यांची नियुक्ती आज जाहीर केली. गीता गोपिनाथ यांची नियुक्ती करताना लगार्ड यांनी म्हटले आहे, की गोपिनाथ या उच्च दर्जाच्या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांची शैक्षणिक गुणसंपदा अतित्युम आहे. त्यांनी आपले बौद्धिक नेतृत्व सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील काम करण्याचा त्यांना गाढा अनुभव आहे. त्यांची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे.

गोपिनाथ सध्या हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू, हॅण्डबुक ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सच्या सहसंपादिका आहेत. त्यांनी आतापर्यंत आर्थिक विषयांवर चाळीसहून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत.

केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या अर्थसल्लागार म्हणून काम पाहिलेल्या गीता गोपिनाथ यांचा जन्म 1971 चा. कोलकत्याचा. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी, तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉश्गिंटन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात 2001 मध्ये पीएचडी पूर्ण केली. शिकागो विद्यापीठातून त्यांनी सह-प्राध्यापक म्हणून कामाला 2005 मध्ये सुरवात केली. त्यानंतर त्या हार्वर्ड विद्यापीठात 2010 मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या.

संबंधित लेख