Girish Mahajan's PA is troublesome | Sarkarnama

गिरीश महाजन यांचे पीए म्हणजे 'डॉक्टरपेक्षा कंपाउंडर भारी '

तुषार खरात : सरकारनामा न्यूज ब्युरो
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई :  राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून गिरीश महाजन कार्यरत असल्याचे राज्यातील सामान्य जनतेला ठाऊक आहे. पण प्रत्यक्षात या खात्याचा कारभार त्यांच्या विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यमुना जाधव व स्वीय सहाय्यक (पीए) रामेश्वर नाईक हे दोघेजणच चालवित असल्याचे चित्र आहे.

विशेषत: रामेश्वर नाईक यांचा या खात्यात इतका हस्तक्षेप वाढला आहे की, `चहापेक्षा किटली गरम` असे त्यांचे वर्णन केले जाऊ लागले आहे. 

वैद्यकीय शिक्षण खात्यातील महत्त्वाच्या निर्णयामध्ये रामेश्वर नाईक नको तेवढे लक्ष घालतात.  उच्चपदस्थ अधिकारी, डॉक्टर्स, अधिष्ठाता यांना फोन करून तंबी देतात. अनेक नियमबाह्य कामे करण्यास सांगतात. त्यांनी सांगितलेले काम ऐकले नाही तर धमकावतात, अशी माहिती या खात्यातील सूत्रांनी नाव न छापण्याचा अटीवर `सरकारनामा`ला दिली.

रामेश्वर नाईक राज्यभरात विविध ठिकाणी वैद्यकीय शिबीरे भरवितात. पण या शिबीरांमध्ये औषधे, चष्मे असे वैद्यकीय साहित्य कुठून येते याची चौकशी करायला हवी. ही चौकशी केली तर नाईक यांचे उपद्व्याप चव्हाट्यावर येतील असेही या सूत्रांनी सांगितले. 

सध्या मंत्र्यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण खात्याचा संपूर्ण कारभार नाईक हेच चालवित आहेत. त्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे अधिकारी, डॉक्टर्स हैराण झाले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी नाईक यांना आवरावे अशीही भावना या सूत्रांनी व्यक्त केली आहे.  

याबाबत रामेश्वर नाईक यांना संपर्कसाधला असता, खात्याचे काम मंत्रीच पाहतात. माझा कसलाही हस्तक्षेप नसतो.उलट मी तिथे फार चांगले काम करत आहे.माझे कुठेही हितसंबंध गुंतलेले नाहीत.काहीजण विनाकारण बदनामी करीतआहेत. वैद्यकीय शिबिरांसाठीची औषधे व  साहित्य विविध कंपन्यांच्या सीएसआरफंडातून मिळविली आहेत. यात कसलाहीगैरप्रकार नाही, असा दावा त्यांनी केला. 

संबंधित लेख