Girish Mahajan Teases Opponents over Maratha Reservation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मराठा आरक्षणावर उड्या मारणारे विरोधक आता काय करतील? : गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 2 डिसेंबर 2018

"विरोधी पक्षाची मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन उड्या मारत होती. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे आता तो मुद्दा संपला. आता विरोधकांकडे मुद्देच नाहीत. ते तरी काय करणार बिचारे!'' असा उपहासात्मक टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावला.

नाशिक : "विरोधी पक्षाची मंडळी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन उड्या मारत होती. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यामुळे आता तो मुद्दा संपला. आता विरोधकांकडे मुद्देच नाहीत. ते तरी काय करणार बिचारे!'' असा उपहासात्मक टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावला.

ते म्हणाले, "मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण आम्ही दिले. या प्रश्‍नावर विरोधक राजकारण करत होते. विषय तापवत होते. याच मुद्यावर ते उड्या मारत होते. आता हा मुद्दा संपला. आता ते काय करतील?."
 
नांदुरी (वणी) येथे आदिवासींसाठी आयोजित महाआरोग्य शिबाराला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ''आमचे सर्व लक्ष जनतेची कामे करण्यावर आहे. दुष्काळाचे निवारण करण्यात आम्ही मनापासुन कामाला लागलो आहे. मराठवाड्यात यंदा केवळ वीस टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे चारा, पिण्याचे पाणी यांसह दुष्काळाचे चित्र अतिशय विदारक आहे. या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार युध्द पातळीवर व्यवस्था करीत आहे. सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना जेव्हढी मदत सध्याच्या सराकरने केली तेवढी आजवर कोणत्याही सरकारने केलेली नाही." 

संबंधित लेख