अजितदादांच्या आव्हानावर महाजन म्हणतात...वाद पुरे, विकासाचं बोलू! 

बारामतीत जावून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'महाजन बारामतीत याच दाखवतो तुम्हाला...!' असे आव्हान दिले होते. तर राष्ट्रवादी काँगेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी महाजन आता निवडून येवून दाखवा, असेही आव्हान जामनेर येथे जाहिर सभेत दिले होते.
अजितदादांच्या आव्हानावर महाजन म्हणतात...वाद पुरे, विकासाचं बोलू! 

जळगाव : वादाचे नकोत, आता राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासाच्या कामांवर बोलू असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना केले. 

बारामतीत जावून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. त्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'महाजन बारामतीत याच दाखवतो तुम्हाला...!' असे आव्हान दिले होते. तर राष्ट्रवादी काँगेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी महाजन आता निवडून येवून दाखवा, असेही आव्हान जामनेर येथे जाहिर सभेत दिले होते. जलसपंदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारले असता, महाजन म्हणाले 'वादाचे विषय नको,राज्यातील विकासाचे काम करावयाचे आहे.' त्यांनी या विषयी पुढे काहीही बोलण्यास नकार दिला. 

पाणी आरक्षण, चारा छावण्या
राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासन उपयोजन करीत आहे. असे मत व्यक्त करून महाजन म्हणाले, "राज्यात गेल्यावर्षी धरणात 59 टक्के साठा होता, मात्र आज केवळ 41 टक्के साठा आहे. मराठावाडा क्षेत्रातील धरणात केवळ 13 टक्के साठा आहे. तर नागपूरला 22 टक्के साठा आहे. त्यामुळे आहेत त्या स्थितीत पाण्याचा विनीयोग कसा करण्यात येईल. याचे नियोजन करण्यात आले आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्यात येईल. महसूल विभागातर्फे तर टंचाईग्रस्त गावात पाणी टॅंकर व चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे."
 
'बलून'साठी दोन दिवसात बैठक 
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवर सात बलून बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी निधी आवश्‍यक आहे. त्याबाबत बोलतांना महाजन म्हणाले, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत निधीसाठी येत्या दोन दिवसात बैठक घेण्यात येणार असून त्यांच्याकडून निधी प्राप्त करून येत्या पंधरा दिवसात बलून बंधाऱ्याचे प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com