Girish Mahajan says no more Chicken please ! | Sarkarnama

गिरीश महाजन म्हणतात....बस्स...झाली बाबा आता कोंबडी! 

कैलास शिंदे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

गिरीश महाजन बस्स झाली कोंबडी असे का म्हणतात हे समजून घेण्यासाठी आधीची बातमी वाचा ,

गिरीश महाजनांचे फर्मान निघाले, अन पहूर पोलीस शोधात निघाले त्या २० कोंबड्या !

http://www.sarkarnama.in/girish-mahajan-directs-police-find-stolen-20-hens-27277

 

जळगाव  : बस्स..झाली बाबा आता कोबंडी..! जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. अर्थात श्रावण महिना लागला म्हणून ते म्हटले असतील असे वाटत असेल तर चुकिचे आहे. कारण ते शुध्द शाकाहारी आहेत.चोरीस गेलेल्या कोबंड्याच्या तपासाचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर प्रसिध्दीमाध्यमानी त्यांनी विचारणा सुरू केली. त्यानंतर तेच म्हणाले..बस्स झालं! 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आपल्या मतदार संघात आल्यानंतर लहान मोठ्या तक्रारींची दखल घेतात. मतदार संघातील एका पोल्ट्री चालकाच्या वीस कोंबडया चोरीस गेल्या होता. याबाबत पोल्ट्री चालकाने महाजन यांच्याकडे तक्रार केली त्यानतंर त्यांनी फोन करून पोलीसांनी चोरीचा तपास करण्याचा आदेश दिला होता. यानंतर ही बातमी संपूर्ण महाराष्टभर गाजली.

याबाबतीत उल्लेख करतांना जळगाव 'सकाळ'च्या खानदेश आवृत्तीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना ते म्हणाले," आजच्या स्थितीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि प्रिंट मिडीया सजग झालंय. त्याचा आपल्यालाही अनुभव आला आहे, राज्याचा मंत्री असल्यामुळे आपण 15 ते २० दिवसानी घरी येतो. त्यानंतर आपण सकाळी मतदार संघातील नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवितो." 

" त्याप्रमाणे आपण दोन दिवसापूर्वी घरी नागरिकांच्या तक्रारी ऐकत असतांना मतदार संघातील पोल्ट्री चालक कोंबड्या चोरीस गेल्याची तक्रार घेवून आला. त्यांने तीन वेळा बॅंकेचे कर्ज काढले आणि तीन वेळा त्यांच्या कोबंड्या चोरीस गेल्यामुळे त्याला मदत करण्याची खरी गरज आहे. या हेतूने आपण पोलीसांना कोंबड्या चोरीच्या चौकशी करावी असा फोन केला. पण त्याच वेळी त्या ठिकाणी पत्रकार असल्याचे आपल्या लक्षात आले नाही, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा गहजब झाला.चक्क प्रसिध्द माध्यमानी आपल्याला त्या कोबंड्याची विचारणा सुरू केली त्यावेळी आपण त्यांना म्हटलो...आता बस्स झाली बाबा कोंबडी..!", असे म्हणत गिरीश महाजन यांनी कोंबडी पुरणाला पूर्णविराम दिला !

 

संबंधित लेख