Girish Mahajan reaches Kerala with a squad of 100 doctors | Sarkarnama

शंभर  डॉक्टरांचे पथक सोबत घेऊन गिरीश महाजन केरळमध्ये दाखल 

सरकारनामा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

केरळमध्ये पूरग्रस्त जनतेला  वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० जणांचे वैद्यकीय पथक  ट्रकभर गोळ्या-औषधांसह केरळकडे रवाना झाले आहे.

मुंबई  : केरळमध्ये पूरग्रस्त जनतेला  वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली १०० जणांचे वैद्यकीय पथक  ट्रकभर गोळ्या-औषधांसह केरळकडे रवाना झाले आहे.

केरळमध्ये अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. या नैसर्गिक संकटप्रसंगी सर्व आवश्यक ती मदत पुरविण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे .  केरळमध्ये  अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली  १०० जणांचे वैद्यकीय पथक आवश्यक गोळ्या-औषधांसह भारतीय वायूसेनेच्या दोन विशेष विमानांनी आज सकाळी केरळकडे रवाना झाले.

या वैद्यकीय पथकामध्ये जे. जे. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५० तर, ससून रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गजानन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली २६ वैद्यकीय अधिकारी त्याशिवाय  इतर स्वयंसेवक-सहायकांसह १०० जण सहभागी झाले आहेत.

संबंधित लेख