वाढदिवस साजरा न करता गिरीश महाजनांनी भागवली दुष्काळग्रस्तांची तहान 

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य दिले. सर्व कार्यक्रम टाळत त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी वाड्यांची तहान भागवण्यासाठी टॅंकर उपलब्ध केले.
वाढदिवस साजरा न करता गिरीश महाजनांनी भागवली दुष्काळग्रस्तांची तहान 

नाशिक : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य दिले. सर्व कार्यक्रम टाळत त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी वाड्यांची तहान भागवण्यासाठी टॅंकर उपलब्ध केले. 

विविध चाकोरीबाहेरच्या उपक्रम आणि कामकाजामुळे महाजन चर्चेत असतात. यंदा राज्यात व त्यांनी पालकत्व घेतलेल्या नाशिकला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या सोबतच त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पोस्टर बॅनर यावर पैसे खर्च न करता सामाजिक उपक्रम घेण्याबाबत सल्ला दिला होता. त्यानुसार नाशिक येथे पंचवटी मंडळांतर्गत 'एचायव्ही'बाधीत रुग्ण व विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप केले. 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात युवा मोर्चा मार्फत दुष्काळग्रस्त भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर वितरण करण्यात आले. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जी. एम. फाऊंडेशन व  कार्यकर्ते यांच्या मार्फत शिर्डी चे साईबाबांच्या चरणी समाधीला चादर चढवून व खानदेश कुलस्वामिनी सप्तश्रुंगी मातेस अभिषेक अर्पण करून महाजनांना दीर्घायुष्य मिळावे व त्याच्या हातून राज्यात अशीच समाजसेवा अखंड घडावी ही प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमांमुळे त्यांचा यंदाचा वाढदिवस चर्चेत राहिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com