girish mahajan mumbai and nagpur water | Sarkarnama

नागपूर आणि मुंबईतील पाण्याची तुलना नकोच: गिरीश महाजन 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 जुलै 2018

जळगाव : नागपूरला कधी नव्हे तो जोरदार पाऊस झाला, त्यामुळेच पाणी साचले ही नैसर्गिक आपत्ती आहे. मुंबईत रस्त्यावर साचणारे पाणी महापालिकेच्या तांत्रिक चुकामुळे साचते त्यामुळे दोन्हीकडच्या पाण्याची तुलना करू नका असे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

जळगाव येथे पत्रकांरांशी बोलताना ते म्हणाले, की नागपूर येथे साचलेल्या पाण्याबाबत विरोधक राज्यसरकारला दोष देत आहेत हे अत्यंच चुकिचे आहे. त्याला कोणताही आधार नाही. नागपूर येथे दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचले. अगदी विधानभवनातील कामकाजही बंद करावे लागले. विरोधकांनी याचेही भांडवल केले आहे. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यांनी याचा दोष सरकारला दिला आहे. परंतु ही अचानक आलेली नैसर्गिक आपत्ती आहे. हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. 

मुंबईत पाणी साचले तर भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईतील शिवसेनेच्या महापालिकेच्या कारभारावर टिका करते या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते म्हणाले, कि मुबंईतील साचणारे पाणी आणि नागपूरमध्ये साचणारे पाणी यांची तुलना करणे अत्यंत चुकिचे आहे. मुबंईतील रस्त्यावर साचणारे पाणी महापालिकेच्या तांत्रिक चुकामुळे साचत असते. नागपूरात रस्त्यावर साचलेले पाणी ही नैसर्गिक आपत्ती आहे.  
 
संबंधित लेख