girish mahajan minister | Sarkarnama

नियोजन मंडळाची गुरकिल्ली महाजनांकडे !

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत 40 जागांसाठी 112 इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे. बहुतांश प्रस्थापितांनी यात अर्ज दाखल केले आहेत. 
त्यामुळे भाजप- शिवसेनेत थेट संघर्ष होईल. त्यात इच्छुक व प्रतिस्पर्धी पक्ष दोन्हींची स्थिती पाहता या निवडणुकीची सूत्रे पालकमंत्री गिरीष महाजनांकडेच राहण्याची चिन्हे आहे. 

नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत 40 जागांसाठी 112 इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहे. बहुतांश प्रस्थापितांनी यात अर्ज दाखल केले आहेत. 
त्यामुळे भाजप- शिवसेनेत थेट संघर्ष होईल. त्यात इच्छुक व प्रतिस्पर्धी पक्ष दोन्हींची स्थिती पाहता या निवडणुकीची सूत्रे पालकमंत्री गिरीष महाजनांकडेच राहण्याची चिन्हे आहे. 

या निवडणूकीत सर्वाधिक तेवीस सदस्य जिल्हा परिषद गटातील आहेत. येथे भाजप- राष्ट्रवादी तसेच शिवसेना- कॉंग्रेस असे समिकरण आहे. मात्र दोन्हींचे संख्याबळ समान असून त्यांची सत्ता मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांवर स्थिरावली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दाखल केली आहे. कॉंग्रेस पक्षात उमेदवारीवरुन फूट पडली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजप बरोबर जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या स्थितीचा लाभ भाजपला होण्याची शक्‍यता आहे. नाशिक व मालेगाव या दोन महापालिकांतून चौदा सदस्य निवडून जातील. नाशिकला भाजपकडे 66 सदस्य असल्याने त्यांचे किमान चार सदस्य निवडून येतील. मालेगावला अन्य पक्षांशी साटेलोटे करुन दोन सदस्यांची त्यांनी बेगमी केली आहे. अशा स्थितीत नियोजन मंडळावर भाजपचा वरचष्मा राहण्याचीच चिन्हे आहेत. उमेदवारी माघारीत पालकमंत्री त्याबाबत राजकीय समतोल साधणारा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सत्तेच्या चाव्या सध्या तरी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडेच आहेत. 

शिवसेनेकडून राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आल्याने अखेरच्या दिवशी पालकमंत्री गिरीश महाजन अन्‌ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांमध्ये लढत रंगणार हे स्पष्ट झाले. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसाच्या आदल्या दिवशी एकत्रित बसून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, खासदारांच्या पत्नीसह माजी आमदारांचे नातेवाईक नशीब आजमावत आहेत. सदस्यसंख्येच्या प्रमाणात सदस्य निवडून द्यायचे असल्याने कोटा आणि पडद्याआडच्या "वाटाघाटी'कडे लक्ष लागले आहे. 
 

संबंधित लेख