girish mahajan lock rook | Sarkarnama

...जेव्हा मंत्री गिरीष महाजन स्वत:ला कोंडून घेतात ! 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

नाशिक : महापालिकेतील वर्चस्वावरुन भाजपमधील आमदार देवयानी फरांदे व शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यात स्पर्धा आहे. या दोघांमदील पालकमंत्री गिरीष महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच यांच्यासमोरच उफाळून आला. दोन आमदारांच्या भांडणामुळे मंत्री गिरीष महाजन यांनी कक्षात जाऊन दारच बंद करून घेतले. 

नाशिक : महापालिकेतील वर्चस्वावरुन भाजपमधील आमदार देवयानी फरांदे व शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यात स्पर्धा आहे. या दोघांमदील पालकमंत्री गिरीष महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासमोरच यांच्यासमोरच उफाळून आला. दोन आमदारांच्या भांडणामुळे मंत्री गिरीष महाजन यांनी कक्षात जाऊन दारच बंद करून घेतले. 

खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या मुलाच्या लग्नसमारंभानिमित्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकला आले होते. यावेळी विश्रामगृहावर आमदारांसह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार फरांदे यांनी आयुक्त मुंडे यांने गुणगान गाण्यास सुरवात करतानाच आमदार सानप संतप्त झाले . ते म्हणाले, की "शहर विकायला काढले का ?' असा प्रश्‍न केला. यावेळी दोघांच्या समर्थकांनी एकमेकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. फरांदे व सानप यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

सानप यांना महापौरांसह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे देखील पाठबळ मिळाले. त्यामुळे आमदार फरांदेंना माघार घ्यावी लागली. या शाब्दिक वादावादीने टोक गाठल्याने पालकमंत्र्यांनी काढता पाय घेत कक्षात गेले आणि दार लावून घेतले.. बंद खोलीचे दरवाजे वाजवूनही पालकमंत्री बाहेर न आल्याने तूर्त वादावर पडदा पडला तरी आयुक्त मुंडे यांच्यावरून भाजपमधील असंतोष कायम राहिला आहे. 

या वादात पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनीही उडी घेतली. आमदार सानप यांनी सदस्यांचे अधिकार गहाण ठेवल्याचा उल्लेख करत पालकमंत्री कशाला येतात ? पक्षात काय चाललंय त्यांना समजत नाही का ? त्यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडण्याचा सल्ला दिला. महापौर रंजना भानसी यांनी देखील आमदार फरांदे यांचा शाब्दिक हल्ला परतून लावत "आयुक्त लहान मूल आहे का ?' असा सवाल केला. कोणाला विश्‍वासात घेत नाहीत, कामकाजाची विचित्र पद्धत आहे. आरतीला आले नाही तर नोटीस देण्याची धमकी देतात असे आरोप केला. या वादामुळे पालकमंत्र्यांनी तेथुन काढता पाय घेतला. 

संबंधित लेख