girish mahajan got success in jalgoan | Sarkarnama

गिरीश महाजनांनी करुन दाखवले, मात्र चंद्रकांतदादांना तेवढे जमले नाही! 

स्वरुप जानकर 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

प्रचार सुरु असताना सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंबंधी वादग्रस्त विधाने केली होती. त्यानंतर पुन्हा हिंसा वाढली. शेवटी पाटील यांना हातापाया पडण्याची भाषा करावी लागली. तसेच दोनवेळा जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होवू शकली नाही. त्याचा परिणाम निकालावर स्पष्ट दिसत आहे. 

पुणे: राज्यात मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळला असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था राखण्याच्या चिंतेत होते. त्यावेळी जळगाव महापालिकेचा किल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन लढवत होते. त्यांनी ती जबाबदारी पुर्ण करुन दाखवली. 

जळगावात सुरवातीला सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेबरोबर युती करण्याचा गिरीश महाजन यांचा विचार होता, मात्र एकनाथ खडसे यांनी तीव्र विरोध केल्याने भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. आयत्यावेळी ही भूमिका घेतली असलीतरी त्यांची पुर्वतयारी होती. गिरीश महाजन यांनी बारकाईने नियोजन केले, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. त्याचा परिणाम म्हणून 75 संख्येच्या महापालिकेत भाजप 57 जागांच्या आसपास आहे. या निकालाच्या निमित्ताने महाजन जिल्ह्याचे नेते म्हणून उदयास आले आहेत. 

सांगली भाजप जिंकणार, अशी हवा काही महिन्यांपुर्वी होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला सांगली-मिरजेत भाजपचे आमदार असल्याने कोणत्याही परिस्थितीत जिंकणार, असा चंग भाजपने बांधला होता. तसे नियोजन केले होते. चंद्रकांत पाटील नेतृत्व करत होते. सोबतीला पालकमंत्री सुभाष देशमुख आणि स्थानिक आमदार होते, मात्र प्रत्यक्षात भाजपला जळगावसारखे यश मिळवता आलेले नाही. 

 

संबंधित लेख