girish mahajan charisma continue.... | Sarkarnama

गिरीश महाजनांची जादू कायम : हाती घेतले ते तडीस नेले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळातील कोणत्या सदस्यावर सर्वाधिक खूष असतील तर ते गिरीश महाजन यांच्यावर. महाजन यांच्यावर जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली ती महाजनांनी यशस्वी करून दाखवली. धुळे महापालिकेची सूत्रे महाजन यांच्याकडे दिल्याने भाजपच्या यशात आणखी यशाचा तुरा गोवला गेला आहे. 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळातील कोणत्या सदस्यावर सर्वाधिक खूष असतील तर ते गिरीश महाजन यांच्यावर. महाजन यांच्यावर जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली ती महाजनांनी यशस्वी करून दाखवली. धुळे महापालिकेची सूत्रे महाजन यांच्याकडे दिल्याने भाजपच्या यशात आणखी यशाचा तुरा गोवला गेला आहे. 

नाशिक येथील पालकमंत्रीपद महाजन यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तेथील महापालिकेत कमळ फुलविले. त्यानंगर जळगाव पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणली. आता तिसरी निवडणूक त्यांनी धुळ्यात जिंकली. राज्यात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला तरी त्याला राज्याचा प्रतिनिधी म्हणून फडवणीस हे महाजन यांना पुढे करतात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी महाजन यांच्यावर सोपविली जाते.

 
जळगावमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दूर करून फडणविसांनी महाजन यांना जवळ केले. जळगाव महापालिकेची सारी सूत्रे महाजन यांनी फिरवली. खडसे यांना पक्षातून महाजन यांच्या रूपाने पर्याय उभा केला जात असल्याचे त्यामुळे बोलले जाऊ लागले.  महाजन यांनी स्वतःच्या जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत २५ पैकी २५ जागा निवडून आणून आणि पत्नीला नगराध्यक्ष करून महाजन यांनी कमाल केली होती. राज्याच्या विविध भागांतील जबाबदारी मिळत असली तरी स्थानिक राजकारणाकडेही महाजन यांचे दुर्लक्ष नसल्याचे सिद्ध झाले.

महाजन हे तसे मनमौजी गृहस्थ आहेत. मंत्री असले तरी गणपती मिरवणुकीत मनसोक्त नाचतील. कमरेला पिस्तूल लटकावून शाळेत जातील. बिबट्याचा पाठलाग स्वतः करतील. एखाद्याची चिखलात रुतलेली गाडी पदाचा मान विसरून स्वतः काढतील. त्यांना फिटनेसची आवड आहे. रोज व्यायाम करणारे मंत्री म्हणून त्यांचा लौकीक आहे. पण राजकीय क्षेत्रातील त्यांचा फिटनेसही उत्तम राहिल्याचे निकालावरून दिसून येत आहे. फडणवीस यांनी त्यांच्याकडे जलसंपदा हे महत्त्वाचे खाते सोपविले होते. त्यानंतर तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही त्यांच्याडे देण्यात आली. त्या खात्यामार्फत महाआरोग्य शिबिरे भरवून महाजन यांनी आपली ओळख निर्माण केली.

 दरबारी राजकारण आणि जनमानसांवरील राजकारण या दोन्हींत तरबेज असल्याचे महाजन यांनी दाखवून दिले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अमित शहांचा विश्वास आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा खरा विश्वास महाजनांवर आहे. हे अनेकदा दिसून आले आहे. या विश्वासास महाजन हे उतरत आहेत. म्हणूनच धुळ्यातील यशाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचे पान खोचले गेले आहे.

संबंधित लेख