girish bapat offers chair to ajit pawar | Sarkarnama

अजितदादा, इथली खुर्ची देतो पण मुंबईतील नाही : बापटांचा चौकार 

उमेश घोंगडे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

पुणे : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील डेक्कन येथील आझाद मित्र मंडळाच्या व्यासपीठावर गुरूवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट झाली. अजित पवार येताच तातडीने उठत बापट यांनी त्यांचा खुर्ची दिली व म्हणाले, ""दादा मी तुम्हाला इथली खुर्ची देतो, मात्र मुंबईतील नाही'', यावर तेवढ्याच मिश्लिलपणे अजित पवार यांनी उत्तर दिले. मुंबईतील खुर्ची कुणाला द्यायाची ते गणपती बाप्पा ठरवतील. 

गणशोत्सवाच्या काळात विविध राजकीय व्यक्ती शहरातील गणेश मंडळाना भेटी देत असतात. अजित पवार तसेच बापट यांनी गुरूवारी पुण्यातील काही मंडळांना भेट दिली. डेक्कन येथील आझान मित्र मंडळाच्या व्यासपीठावर या दोघांची योगायोगाने भेट झाली. पवार येण्याआधी बापट, त्यांच्या स्नुषा स्वरदा बापट तसे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बापट कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते.

त्याचवेळी पवार या ठिकाणी दाखल झाले. ते येताच बापट यांच्यासह सारेच उठून उभे राहिले. सर्वांनीच पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. त्यानंतर खुर्ची देण्यावरून बापट व पवार यांच्यात झालेल्या संवादातून चांगलाच हशा पिकला.

पुण्यातील गप्पांचे कट्टे बापट यांच्यासाठी नवीन नाहीत. मात्र पवार यांना अशाप्रकारे गप्पांचे कट्टे गाजवण्याची सवय नाही. बापट यांच्या पुण्यात रंगणाऱ्या कट्टयांच्या मैफिलीत पवार यांनी सहभागी व्हावे, असा आग्रह त्यांचे पुण्यातील काही कायकर्ते करतात. मात्र पवार यांनी अद्याप ते मनावर घेतलेले नाही. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख