girish bapat mohan joshi pune water | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

पुण्याच्या पाण्यासाठी आमदारकीचे राजीनामे द्या ! मोहन जोशींची बापटांसह भाजप आमदारांना आव्हान 

उमेश घोंगडे 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे : विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात पुण्याला पाण्याचा न्याय्य वाटा देण्याचा निर्णय घ्यावा. भाजपच्या आठ आमदारांनी तोंडदेखल्या मागण्या करून नयेत. जर हक्काच्या पाणी मिळत नसेल तर आठही आमदारांनी पुणेकरांसाठी आमदारकीचे राजीनामे द्यावेत, असे आव्हान कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी आज दिले. 

पुणे : विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात पुण्याला पाण्याचा न्याय्य वाटा देण्याचा निर्णय घ्यावा. भाजपच्या आठ आमदारांनी तोंडदेखल्या मागण्या करून नयेत. जर हक्काच्या पाणी मिळत नसेल तर आठही आमदारांनी पुणेकरांसाठी आमदारकीचे राजीनामे द्यावेत, असे आव्हान कॉंग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी आज दिले. 

पुण्याच्या पाणी पुरवठ्यात गेल्या एक महिन्यापासून गोंधळ आहे. अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी फारसे काही करताना दिसत नाहीत. 
एकवेळ पाणी पुरवठ्याने पुणेकरांचे आणखी हाल होत आहेत. पाणी पुरवठ्याबाबत हेतुतः गैरसमज पसरविले जाऊन पुण्यावर पाणी वाटपात अन्याय केला जातो. गेल्या दोन तीन वर्षात भाजप सरकारच्या निष्कीयतेचा फटका पुणेकरांना बसत आहे. पुण्याला पाणी पुरविणाऱ्या चारही धरण क्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस झाला आणि धरणात पुरेसा पाणीसाठा असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर ऑक्‍टोबर महिन्यात कपात करण्यात आली, असा आरोप जोशी यांनी केला आहे. 

पुण्याच्या पूर्व भागाला भामा आसखेड प्रकल्पातून पाणी पुरविण्याची योजना होती . या सरकारला त्यात यश आलेले नाही . पाण्याची गळती थांबविण्यात अपयश आले आहे. पुणेकरांना 24 तास पाण्याचे आश्वासन दिले. याकरिता कर्ज काढले पण ही योजना फसली आहे. दोनशे कोटींच्या कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड करदात्या पुणेकरांवर पडत आहे. एकेकाळी मुबलक पाणी असणाऱ्या पुणेकरांना आता हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे, ही दुर्दैवी स्थिती राज्यात व महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने आणल्याचा आरोपह जोशी यांनी केला. 

संबंधित लेख