girish bapat criticizes ajit pawar | Sarkarnama

अजित पवार यांनी काय दिवे लावले : गिरीश बापट यांचा सवाल

उमेश घोंगडे
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे : खडकवासला धरणाचा कालवा फुटल्यामुळे नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केली. हा कालवा फुटल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टिकेलाही त्यांनी या निमित्ताने उत्तर दिले.

पुण्यातील दत्तवाडी, जनता वसाहत परिसरात हा कालवा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी महापौर मुक्त टिळक यांना घेरावही घातला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेथे भेट दिली. त्या वेळी त्यांनी बापट यांच्यावर टीका केली होती. 

बापट हे काल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनिमित्त मुंबईत होते. ते घटनास्थळी काल पोहोचू शकले नाहीत. याचा उल्लेख करत पवार यांनी त्यांच्यावर तोफ डागली होती. जनतेला मदत करण्याऐवजी बापट हे निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत, अशा शब्दांत त्यांनी वार केला होता. या टिकेला बापट यांनीही आज प्रत्तुत्तर दिले.

ते म्हणाले की ही वेळ राजकारण करण्याची नाही. मात्र पवार यांनी यात विनाकारण राजकारण आणले. त्यांच्याकडे जलसंपदा विभागाचा कारभार होता. त्यांनी गेल्या दहा वर्षांत या कालव्यासाठी काय दिवे लावले, हे जनतेला माहीत आहे.

बापट यांच्या या टिकेला आता राष्ट्रवादी काॅंग्रेस काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता लक्ष आहे.

संबंधित लेख