girish bapat | Sarkarnama

बापट, फुंडकर यांना ऑस्ट्रेलियातून परत बोलवा - पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे : अतिरिक्त तुरीच्या उत्पादनामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्याला अडचणीत लोटून पुरवठामंत्री गिरीश बापट आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांनी परदेश दौऱ्यावर जाणे योग्य नसल्याने या दोघांनाही तातडीन मायदेशी परत बोलवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

चव्हाण यांनी याबाबत बापट आणि फुंडकर यांच्या भूमिकांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांची दौऱ्याची वेळ चुकल्याचे नमूद केले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर सदस्यही या दौऱ्यात आहेत. 

या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे की तुरीच्या प्रश्‍नावर राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने सांगितले म्हणून शेतकऱ्यांनी तूर मोठ्या प्रमाणात उत्पादित केली. ही तूर हमीभावाने खरेदी केली जावी यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर आला आहे. या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी व या प्रश्‍नात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याचे सोडून पुरवठामंत्री हे परदेश भ्रमण करीत आहेत. 

या प्रश्‍नात पुरवठामंत्र्यासह कृषिमंत्र्यांचीही भूमिका महत्त्वाची असताना हे दोघेही त्यांच्या कुटुंबियांसमवेत 15 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असणे योग्य वाटत नाही. या दौऱ्याची वेळ चुकीची आहे. नियमानुसार या दौऱ्यासाठी संबंधितांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घेतली असेल. सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता या दोघांनी त्यांच्या कर्तव्याला जागणे गरजेचे आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांना सांगून या दोन्ही मंत्र्यांना पुन्हा महाराष्ट्रात तातडीने बोलवावे. इतर शिष्टमंडळाने आपला उर्वरित दौरा पूर्ण करावा, असेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. 

संबंधित लेख