girish bapat | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शेतकरी चिंता"तूर', मंत्र्याची परदेश "टूर'..!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

मुंबई : राज्यातला शेतकरी दररोज आंदोलन करत असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर व अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट मात्र ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड च्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. संसदीय समितीच्या दहा दिवसांच्या राष्ट्रकुल दौऱ्यावर हे मंत्री गेले आहेत. 

या अभ्यास दौऱ्यात विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि आमदार यांचाही समावेश आहे. 
विधानपरिषद सदस्य व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही या दौऱ्याचे निमंत्रण होते मात्र त्यांनी राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्‍न महत्त्वाचा असल्याने निमंत्रण नाकारले आहे. 

राज्यात तूर, कांदा, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाला असताना कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कितपत गंभीर आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या दौऱ्याचे समर्थन करत हे मंत्री अभ्यास दौऱ्यासाठीच गेले आहेत. तिथल्या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्‍त करत. 

संबंधित लेख