gibaar mendonsa, mumbai | Sarkarnama

  राष्ट्रवादीचे नेते गिल्बर्ट मेंडोन्सांच्या  हाती शिवधनुष्य, शिवसेनेत प्रवेश 

ब्रह्मा चट्टे 
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सां यांनी आपल्या समर्थकासह आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी मेंडोसा यांचे समर्थक माजी महापौर कॅटलिन परेरा, नगरसेवक व्हेंटर मेंडोसा, नगरसेवक बनोल डिमेलो, नगरसेवक भगवती शर्मा, नगरसेविका हेलन जॉर्ज उपस्थित होते. 

पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मेंडोन्सा म्हणाले, " मीरा भाईंदर महापालिकेतील महापौर, आमदार यांनी खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. तो संपवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 13 नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर बसणार आहे. न्यायावर माझा विश्वास आहे. मी निर्दोष आहे. शिवसेनेने मला पडत्या काळात मदत केली आहे. त्यामुळेच मी आज शिवसेनेत प्रवेश केला. 

गिल्बर्ट मांडोसांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत. मात्र ते सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाला ताकद मिळाली असल्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मातोश्रीवर आज झालेल्या पक्षप्रवेशावेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सुभाष भोईर उपस्थित होते. 

संबंधित लेख