गणपतराव देशमुख हे तर भीष्म पितामह ! 

गणपतराव देशमुख यांच्याविषयी बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, मी दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही, हे आबासाहेबांचे अजरामर विचार त्यांनी मांडले. इतक्‍या डेडिकेशनने आबासाहेब 55 वर्षांपासून काम करत आहेत. अशी माणसे यापुढे कशी मिळणार ? आबासाहेब निष्काम कर्मयोगी आहेत. यांचे संचित जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले काम आहे.
गणपतराव देशमुख हे तर भीष्म पितामह ! 
गणपतराव देशमुख हे तर भीष्म पितामह ! 

मुंबई : शेती, कष्टकरी समाज, पाणी अशा ग्रामीण भागातील मुलभूत समस्यांची मुद्देसूद मांडणी करून त्या सोडविण्यासाठी गणपतराव देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ध्येयनिष्ठा, तत्वनिष्ठा, साधेपणा जपून जनतेशी बांधिलकी जपणारे श्री. देशमुख हे नवीन पिढीला मार्गदर्शक ठरणारे भीष्म पितामह आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. 

गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी श्री. देशमुख यांच्या गौरवशाली कारकिर्दीचा आढावा घेतला. 

विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांच्याविषयी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलने, चळवळ, कारावास या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरूवात करणारे आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचा दहा वेळा निवडून येण्याचा विक्रम मोडीत काढणारे श्री. देशमुख हे महाराष्ट्र विधानसभेतील भीष्म पितामह आहेत. दुष्काळी भागाच्या आणि कष्टकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने झटणारे श्री. देशमुख हे चार राजकीय पिढ्यांशी जोडलेले असून विषयाची मुद्देसुद मांडणीची त्यांची हातोटी नवीन सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. टेंभू, म्हैसाळ प्रकल्पाच्या माध्यमातून सांगोलासारख्या दुष्काळी भागास पाणी मिळविण्याच्या प्रयत्नांबरोबरच ग्रामीण भागातील विविध प्रश्नांची सोडवणूक करताना राज्याला दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. दुष्काळी भागातील सूतगिरणी यशस्वीपणे चालविण्याबरोबरच त्यांनी फळबाग योजनांच्या माध्यमातून हा भाग समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आता डाळींब तसेच सफरचंद बोर निर्यात करण्यापर्यंत या भागाने मजल मारली आहे. या परिसरात झालेल्या विकासकामांमुळे माणदेशातून होणारे स्थलांतर थांबल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. 

आपल्या 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत चार वर्षे मंत्रीपदी तर 51 वर्षे विरोधी पक्षात राहिलेल्या श्री. देशमुख यांनी विधीमंडळातील विविध समित्यांमध्ये काम पाहिले आहे. मंत्री असताना देखील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी तळमळीने केले. राज्यपालांमार्फत सर्वाधिक तीन वेळा हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले ते एकमेव सदस्य असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. 

आपल्या कारकिर्दीच्या माध्यमातून राज्याला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या गणपतराव देशमुख यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे तसेच राज्याला त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यापुढेही प्राप्त व्हावे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. 

मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या या अभिनंदनाच्या ठरावावर विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सदस्य आशिष शेलार, दिलीप वळसे-पाटील तसेच विधानपरिषदेत सदस्य सुनील तटकरे, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, डॉ. नीलम गोऱ्हे, कपिल पाटील आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com