ganpatrao deshmukh about devendra fadavnis | Sarkarnama

फडणवीसांच्या आश्‍वासनाबाबत गाफील राहू नका : गणपतराव देशमुख 

वसंत सानप 
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असलेतरी, त्यावर विश्‍वास ठेवून गाफील राहू नका, असे आवाहन ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनी केले. 

जामखेड (नगर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असलेतरी, त्यावर विश्‍वास ठेवून गाफील राहू नका, असे आवाहन ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव देशमुख यांनी केले. 

पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 224 व्या पुण्यतिथी निमित्ताने चौंडी येथे ते बोलत होते. देशमुख म्हणाले, "चार वर्षांपूर्वी बारामतीत आरक्षणाच्या मागणीसाठी लक्षावधी लोक जमले होते. त्यावेळी आपण निमंत्रित केलेले नसताना आत्ताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस तेथे आले. त्यांनी आमचे सरकार सत्तेत आले, तर पहिल्याच कॅंबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे अश्वासन दिले. प्रत्यक्षात चार वर्षे होऊन गेले मात्र निर्णय झाला नाही. आताही सप्टेंबर महिना अखेरीस आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आपण विश्वास ठेवू मात्र गाफिल राहता कामा नये. आरक्षण घेतल्या शिवाय रहायचे नाही, असा निर्धार यानिमित्ताने करु,असे सांगितले. 

पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी धनगरआरक्षणासंदर्भात समाजातील प्रमुखांची आणि मुख्यमंत्र्यांची मागील आठवड्यात बैठक घडून आणली. सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. टीसचा अहवालही सकारात्मक आल्याची माहिती दिली. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न थोड्याच दिवसात संपेल, अशी ग्वाहीही दिली. त्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी 'क्‍या हुआ तेरा वादा' या धनगर समाजाच्या नागपूर मेळाव्यातील गाण्याची आठवण करुन देत, वो निभानेकी बात आई है, असे मुख्यमंत्र्यांला सुनावले. तसेच यापुढे भाषणबाजी नको, आयोग नको, अहवाल नको. विधानसभेत ठराव आणा आणि कायद्यात दुरुस्ती करुन धनगर समाजाला आरक्षण द्या, विरोधी पक्ष म्हणून आम्ही ठरावाच्या बाजूने राहू, असे सरकारला ठणकावून सांगितले. 

संबंधित लेख