gangapur pi and state government | Sarkarnama

औरंगाबादमध्ये इंटरनेट बंद, गंगापूरचे तहसीलदार व पोलिस निरीक्षकांवर कारवाई

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावामुळे औरंगाबाद शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या "बंद'च्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार व पोलिस निरीक्षक अशा दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान काल गंगापूरमध्ये नदीपात्रात उडी घेऊन मृत्यूमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारने त्याच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर केली असून त्याच्या भावाला सरकारी नोकरीत घेतले जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आज या अंत्यसंस्कारावेळी खासदार चंद्रकांत खैरे व कॉंग्रेसचे नेते सुभाष झांबड यांनी शिंदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला पण संतप्त जमावाने त्यांना तेथून माघारी पाठवले. 

संबंधित लेख