Ganeshrao Doodhgaonkar given 3 days police custody | Sarkarnama

माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी

सरकारनामा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

परभणी : माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना  3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे . 

दुधगाकरांसोबत सेवानिवृत्त तलाठी दत्तात्रे कदम यांच्याही पोलीस कोठडीत आणखीन 3 दिवसाची वाढ करण्यात आली आहे .

परभणी : माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना  3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे . 

दुधगाकरांसोबत सेवानिवृत्त तलाठी दत्तात्रे कदम यांच्याही पोलीस कोठडीत आणखीन 3 दिवसाची वाढ करण्यात आली आहे .

भुखंड लाटल्याप्रकरणी परभणीचे माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी आज सोमवारी  सकाळी त्यांच्या पोखर्णी येथील घरून अटक केली होती .  
 येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील 135 कर्मचाऱ्यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सर्वे नंबर 613 मध्ये 16 एकर 8 गुंठे जमीन घेतली होती. ही जमीन मुख्यप्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली होती.

त्यानंतर माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर व महसूल विभागातील तलाठी डी.एस.कदम यांनी महसुल दप्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या नावे करून दिली. 

या प्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. सोळूंके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासह महसुल विभागातील दत्तात्रय श्रीरंग कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब भागुजी पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसिलदार वि.गो.गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्या विरुध्द ता. 16 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. 

संबंधित लेख