ganesh naik in land maffia shivsena | Sarkarnama

 गणेश नाईक नवी मुंबईतील भूमाफीया, शिवसेनेचा गंभीर आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे नवी मुंबईतील भूमाफिया आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी आज केला आहे. 

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे नवी मुंबईतील भूमाफिया आहेत असा गंभीर आरोप शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी आज केला आहे. 

नाईक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावे ट्रस्ट स्थापन करीत पावणे एमआयडीसीमध्ये डोंगर रांगांच्या खाली 33 ऐकर जागेवर बावखळेश्वर मंदीराची उभारणी केली होती. ऐकरात तीन भव्य मंदीरे, गार्डन, तलाव निर्माण केले होते. नवी मुंबईकरांसाठी पर्यटन स्थळ म्हणून या मंदीराला ओळखले जात होते. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी 2013 साली मुंबई हायकोर्टात याचिका करीत हे मंदीर अनधिकृत असून एमआयडीसीची जागा बळकावल्याचा आरोप केला होता. 

गेल्या पाच वर्षात हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टात केस चालल्यानंतर हे मंदीर अनधिकृत असल्याचे सांगत कोर्टाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यात पोलीस आणि एमआयडीसी टाळाटाळ करीत असून एकमेकांना फक्त पत्रव्यवहार करून वेळ ढकलत असल्याचे कोर्टाच्या निर्देशनास संदीप ठाकूर यांनी आणले होते. अखेर कोर्टाने फटकारल्यानंतर काल कारवाई करून या ठिकाणी असलेली तीनही मंदीरे जमीनदोस्त करण्यात आली आहे. 

नवी मुंबईतीलनेते भूमाफीया असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. सीबीडी येथे सिडकोची खाडीकिनारी असलेली ग्लास हाऊसची जागा आणि एमआयडीसीची ऐकर जागा बळकावण्याचा प्रयत्न करून कोट्यवधी रूपयांची जागा हटप करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केला आहे. 

येत्या काळात यांची अनेक काळी प्रकरणे उजेडात आणण्याचा गर्भीत इशाराही त्यांच्याकडून देण्यात आलाय. दरम्यान शिवसेनेने केलेल्या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 
 

संबंधित लेख