गणेश नाईकांची सायकलवारी....नेईल का त्यांना विधानभवनावरी?

गणेश नाईकांची सायकलवारी....नेईल का त्यांना विधानभवनावरी?

मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा कामाला जोरदार सुरुवात केली. आज त्यांनी सायकलवरून प्रवास करून आपण पुढील निवडणुकीसाठी तयार असल्याचं दाखवून दिले आहे.

नाईक यांचा सायकलवरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाशी ब्रिज वरील हा व्हिडीओ आहे. सफेद कपडे आणि डोळ्याला गॉगल लावून नाईक सायकलिंग करताना पाहायला मिळताहेत.

मागील निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघातुन भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाईक यांचा पराभव केला होता. आता गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा लढवावी अस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे.  नाईक मात्र लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत.

लोकसभा की विधानसभा याचा निकाल नाईक यांनी अद्याप घेतलेला नाही. मात्र यंदा तयारी करून रिंगणात उतरणार याचा निकाल त्यांनी घेतला आहे. मंदा म्हात्रे आता त्यांंच्या सायकलस्वारीला कसे प्रत्युत्तर देणार, याची उस्तुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com