ganesh naik | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आरोग्य सुविधांच्या पाहणीसाठी गणेश नाइकांचा रुग्णालय दौरा

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईकांनी आज वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत माजी खासदार संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईकांसह महापालिकेतील अनेक नगरसेवक सहभागी झाले होते. 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईकांनी आज वाशीतील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत माजी खासदार संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, माजी महापौर सागर नाईकांसह महापालिकेतील अनेक नगरसेवक सहभागी झाले होते. 

नवी मुंबईतील आरोग्यसेवा जनतेच्या विश्‍वासास अधिक पात्र ठरविण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने लवकरच संबंधित सर्व घटकांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती गणेश नाईक यांनी बुधवारी दिली. नाईक यांनी वाशीतील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचा सकाळी पाहणी दौरा केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 

पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सल्लागार म्हणून पालिकेच्या रुग्णालयांमधून जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा दिली जाते आहे की नाही तसेच रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्‍टर इत्यादी घटकांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी या पाहणीदौर्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम संदर्भ रुग्णालयातील रुग्णकक्ष, खानपान कक्ष, औषध भांडार आदींना त्यांनी भेटी दिल्या. रुग्ण, कर्मचारी आणि डॉक्‍टरांबरोबर चर्चा केली. औषध भांडारातील पाहणीप्रसंगी लोकनेते नाईक यांच्या लक्षात आले की, 2014साली काही औषधांच्या निविदा निघाल्या होत्या. पालिका प्रशासनाने त्यावेळी औषधे खरेदी केली नाही. त्यानंतर औषधांच्या किंमत वाढल्या. त्यामुळे ही खरेदी प्रक्रिया खोळंबली. जुन्या दराने औषध पुरवठा करण्यास निविदाकार तयार नाहीत. अशा प्रकारच्या इतर काही समस्या सोडविण्यासाठी तसेच ज्या उद्घिष्टांसाठी आरोग्यसेवा सुरू करण्यात आली आहे त्याची पूर्तता होते आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी लवकरच महापौरांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व घटकांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

पालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापती सलुजा सुतार यांना लोकनेते नाईक यांनी सूचना केली की, आरोग्य समितीमधील सदस्यांवर शहरातील प्रत्येक पालिका रुग्णालयात नागरिक आणि रुग्णालय प्रशासनामध्ये सुसंवाद साधण्याची जबाबदारी द्या. सुसंवाद साधून रुग्णालयातील अडचणी सोडवा. रोस्टर पद्धतीने रुग्णालय भरती संदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे महापौर पाठपुरावा करतील तसेच यामधील व्यावहारिक अडचणी विषयी बैठकीत ऊहापोह करण्यात येईल, असे लोकनेते नाईक म्हणाले. आरोग्य सेवेनंतर शिक्षण, पाणीपुरवठा सेवा याविषयी सद्यःस्थितीचा आढावा घेण्यात येईल, असे ते म्हणाले. 

सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याविषयी पत्रकारांनी विचारले असता सिडकोचे तत्कालिन व्यवस्थापकीय-संचालक संजय भाटिया यांच्या कार्यकाळात विष्णुदास भावे नाट्यगृहात एका विशेष जनता दरबाराचे आयोजन केले होते. या जनता दरबारात विकास प्रकल्पांविषयी एक सादरीकरण देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड करण्याची सर्वप्रथम मागणी केली होती असे सांगून आता काहीजण त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाल्याचा टोला लोकनेते नाईक यांनी या प्रकरणी श्रेय उपटण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्यांना लगावला. अद्याप सिडकोच्या जमिनी फ्री होल्ड झाल्या नसून बरीच कार्यवाही बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

2015पर्यतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर टिकला पाहिजे असे नमूद करून सर्व घटकांची बांधकामे नियमित करा, आम्ही तुमचा सत्कार करु, असे आव्हान नाईक यांनी विरोधकांना दिले. 

संबंधित लेख