gandhi jayanti nerendra modi | Sarkarnama

...तर हजार गांधी, लाख मोदी आले तरी देश स्वच्छ होणार नाही : मोदी 

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : देशवासीयांच्या सहभागाशिवाय स्वच्छता अभियान पूर्णत्वास जाऊच शकत नाही. स्वच्छता अभियानात सव्वाशे कोटी जनतेचे योगदान महत्त्वाचे असल्याने त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा हजार महात्मा गांधी आणि लाख नरेंद्र मोदी आले, तरी स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असे मोदींनी म्हटले. 

स्वच्छ भारत अभियानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. एक हजार महात्मा गांधी आले, एक लाख नरेंद्र मोदी आले, सर्व मुख्यमंत्री एकत्र आले, सर्व सरकारे एकत्र आली, तरीही स्वच्छ भारताचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही. मात्र सव्वाशे कोटी देशवासी एकत्र आल्यास बघता बघता हे स्वप्न पूर्ण होईल, असे मोदी म्हणाले. 

विरोधकांकडून होणाऱ्या टीकेनंतरही सरकार स्वच्छ भारत अभियानात अग्रेसर राहिले. तीन वर्षांपासून आम्ही अविरतपणे हे अभियान राबवत आहोत. कारण बापूंनी दाखवलेला मार्ग चुकीचा असूच शकत नाही, असा विश्वास आम्हाला आहे. अनेक आव्हाने आहेत. मात्र केवळ आव्हाने आहेत, म्हणून देशाला त्याच स्थितीत ठेवता येणार नाही. ज्या ठिकाणी कौतुक होईल, अशीच कामे आपण हाती घ्यायची का? असा सवालदेखील मोदींनी उपस्थित केला. 

आपल्या भाषणात विरोधकांनाही टोला लगावला. मोदींवर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. मात्र समाजाला जागृत करण्याच्या कामात राजकारण नको, असे ते म्हणाले. समाजात बदल घडवणाऱ्या मुद्यांची थट्टा करू नका, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. 

संबंधित लेख