Gadkari - Fadanvis praise each other | Sarkarnama

 गडकरी, फडणवीसांनी केला परस्परांवर कौतुकाचा वर्षाव !

अरुण जैन :  सरकारनामा ब्युराे
शनिवार, 3 मार्च 2018

भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत सुजलाम् सुफलाम् बुलडाणाचा उदघाटन सोहळ्यात मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मत्री नितिन गडकरी यांनी परस्परांवर कौतुकाचा वर्षाव केला .

बुलडाणा  :  भारतीय जैन संघटनेच्यावतीने आयोजित दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत सुजलाम् सुफलाम् बुलडाणाचा उदघाटन सोहळ्यात मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मत्री नितिन गडकरी यांनी परस्परांवर कौतुकाचा वर्षाव केला .

या सोहळ्यात व्यासपीठावर प्रमुख आकर्षण असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या विदर्भातील दोन्ही ‘हेवी वेट’ नेत्यांची भाषणे झाली. दोघांनीही संघटनेचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत लोकसहभागाचे महत्व अधोरेखीत केले. याचबरोबर हे दोघेही एकमेकांचे कौतूक करण्यास विसरले नाहीत .

 श्री. नितीन गडकरी म्हणाले, " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कार्यक्षम आणि दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यांच्या काळात लाभलेल्या जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्राला खूप मोठा लाभ झाला आहे. शिवाय गुजरात, महाराष्ट्र पाणी प्रश्‍नाच्या बाबतीतही त्यांनी आग्रही भुमिका घेवून आपल्या मागण्या मान्य करून घेत एका मुत्सद्दी  नेतृत्वाचा परिचय दिला आहे."

तर मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या भाषणात गडकरींचा कौतूक सोहळा करण्यास कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले  " बळीराजा जलसंजीवनी योजने  अंतर्गत गडकरींनी 20 हजार कोटींपैकी एकट्या बुलडाणा जिल्ह्याला जीगावच्या रुपाने पाच हजार कोटींची भेट दिली. तर पाच हजार कोटींचे रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडून बुलडाणा जिल्ह्यांच्या समृध्दीच्या वाटा खुल्या करून दिल्या आहेत . यामुळे या दोघांची एकमेकांच्या कौतूकाची जुगलबंदी व्यासपीठावर पहायला मिळाली. याची देखील चर्चा कार्यक्रम स्थळी होती.

एआरडी मॉल समोरील पटांगणात भारतीय जैन संघटनेच्या वतीने सुजलाम् सुफलाम् बुलडाणा या महत्वकांक्षी प्रकल्पाचे औपचारीक उदघाटन आज (ता.3) सकाळी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जेसीबी मशिनचे पुजन करून उद्घाटन केले. कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री पांडूरंग फुंडकर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव हजार होते . 

खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उमाताई तायडे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, आमदार हर्षवर्धन सपकाळ, चैनसुख संचेती, डॉ. संजय रायमुलकर, आकाश फुंडकर, डॉ. शशिकांत खेडेकर, डॉ. संजय कुटे, राहुल बोंद्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, टाटा फाऊंडेशनचे अधिकारीही  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख