gadkari birthday | Sarkarnama

गडकरींचा गौरवनिधी 100 एनजीओंना वाटणार ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मे 2017

या सोहळ्याला 50 हजारावर लोक हजेरी लावणार असल्याचा दावा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपुरातील नगरसेवक व भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांवर कार्यक्रमासाठी लोकांना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आता कस्तुरचंद पार्कवर 50 हजार लोकांना आणण्यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत. 

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त 1 कोटी 1 लाख रुपयांचा गौरवनिधी उभारण्यात आला आहे. हा निधी सामाजिक कार्य करणाऱ्या 100 संस्थांना (एनजीओ) दिला जाणार आहे. 

नितीन गडकरी यांचा 61 वा वाढदिवस कस्तुरचंद पार्कवर साजरा केला जाणार आहे. वाढदिवसानिमित्त 1 कोटी 1 लाख रुपये भाजपचे आमदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून जमा केले आहेत. ही रक्कम विदर्भात सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दिली जाणार आहे. प्रत्येक संस्थेला 1 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. या संस्था कोणत्या, हे स्वतः: या गडकरी जाहीर करणार आहेत. 

गडकरींचा षष्ठब्दीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमाला विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, शिवसेनेचे नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित उपस्थित राहणार आहेत. 

संबंधित लेख