fule nagar mankhurdha | Sarkarnama

महात्मा फुले नगर विकणे आहे ! 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा नगरसेवकपदापासून ते खासदारकीपर्यंतचा प्रवास घडविण्यात मोलाचा वाटा असलेल्या मानखुर्द येथील महात्मा फुले नगरच लोकांनी विकायला काढले असून तसे बॅनर्स मानखुर्द भागात लावण्यात आले आहेत. 

सत्ताधारी शिवसेना आणि इतर राजकीय पक्ष आपल्या नगरात पिण्याच्या पाण्यापासून इतर कोणती सुविधा द्यायला तयार नाहीत. ज्यांना निवडून दिले, ते शिवसेनेचे महापालिकेतील आणि सरकारमधील आमदार, खासदारांना येथील जाणून घेण्यास वेळ नाही. त्यामुळे आम्ही हे नगर विकायला काढले आहे. ते कोणीही खरेदी करावे, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. 

हे बॅनर मानखुर्द विभागात सर्वांचे लक्ष वेधून घेत असून सत्ताधारी शिवसेनेची मंडळी हे बॅनर पाहून हवालदिल झाले आहेत. मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील या नगराची वस्तीही मोठी आहे. हे नगर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जाते. मागील काही वर्षांपासून या नगरातील लोकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याबरोबरच इतर सुविधाही उपलब्ध नाहीत. तुंबलेली शौचालये आणि गटारे, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे सर्वत्र दुर्गंधी आहे. लोकांचे आरोग्य धोक्‍यात आहे. येथील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेवर लोकांनी अनेकदा मोर्चेही काढले. मात्र कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. नागरी सुविधापासून वर्षोनुवर्षे वंचित राहिलेल्या या नगरातील लोकांनी हे नगरच आता विकायला काढले आहे. 

या विभागातील नगरसेवक, आमदार इकडे फिरकत नाहीत तर खासदार राहुल शेवाळेही आता चुकूनही पाहायला येत नाहीत. फुले नगरात, एकीकडे रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी नाही, शोचालये नाहीत, म्हणून आम्हाला हे नगर विकायचे असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. 

संबंधित लेख